भारतामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत. मेल्यानंतर या प्राण्यांचे जतन कसे करायचे हा प्रश्न उपस्थित होतो. या मृत प्राणी – पक्षांच्या जतन करण्याच्या पद्धतीला टॅक्सीडर्मी म्हणतात. भारतामध्ये टॅक्सीडर्मी या कलेच्या माध्यमातून मृत प्राण्यांचे जतन केले जाते आणि संपूर्ण भारतात ही कला जतन करणारे डॉ. संतोष गायकवाड एकमेव टॅक्सीडर्मी लॉजिस्ट आहेत. तर जाणून घेऊया या कलेविषयी…
प्राणी-पक्षांचा मृत्यू झाला तर अनेक प्राणीप्रेमी व पर्यटक हळहळ व्यक्त करतात. त्याचवेळी डॉ गायकवाड यांच्या सारखे डॉक्टर पुढे येऊन त्या प्राण्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये जिवंतपणा आणतात आणि तेच प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. पण या कलेकडे दुर्लक्ष होत असल्याने ही कला लयाला जात असल्याची भीती डॉक्टर व्यक्त करत आहेत आणि त्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलं आहे.