अभिनेत्री अनन्या पांडेची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी झालीय. वडील चंकी पांडेंसोबत आलेल्या अनन्याची पहिल्या दिवशी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) २ तास चौकशीनंतर, आज (२२ ऑक्टोबर) एनसीबीने पुन्हा ४ तास चौकशी केली. यात एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्न खालीलप्रमाणे,
NCB ने अनन्या पांडेला विचारलेले १० प्रश्न
१. चॅटमधून हे स्पष्ट होतंय की तुम्हा दोघांमध्ये ड्रग्ज खरेदी करण्याविषयी चर्चा झाली. तुम्ही किती वेळा ही चर्चा केली?
२. चॅटमध्ये ज्या ड्रग्जवर बोलणं झालं ते कुणी पुरवले होते?
३. तुम्ही हे ड्रग्ज एखाद्या पेडलरकडून थेट खरेदी केले होते का?
४. जेव्हा जेव्हा ड्रग्ज खरेदी केलं तेव्हा त्याचं प्रमाण काय होतं?
५. आर्यनसोबत तू कधीपासून ड्रग्ज सेवन करत आहे?
६. तुमच्यासोबत आणखी कुणी ड्रग्ज घेतलेत?
७. पेडलरला ड्रग्जसाठी पेमेंट कसं करण्यात आलं होतं?
८. इलेक्ट्रॉनिक पेमेंट ट्रांसफर, वॉलेट किंवा कॅश, पेडलरला पैसे कसे दिले?
९. सप्लायर किंवा पेडलरला कोणत्या ठिकाणी भेटले?
१०. ड्रग्ज खरेदी करण्यात मदत करणाऱ्या पुरवठादार किंवा मित्रांची नावं काय?
एनसीबीच्या हाती आर्यन आणि अनन्यामधील व्हॉट्सअॅप चॅट
अनन्या पांडेशी संबंधित ३ व्हॉट्सअॅप चॅट्स सर्वात महत्त्वाच्या ठरत आहे. 2018 ते 2019 च्या दरम्यान झालेल्या या चॅटमध्ये गांजाबाबत बोलणं झालंय. त्यामुळे एनसीबीने अनन्याचे दोन्ही फोन जप्त केलेत. एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अनन्या गोंधळलेली पाहायला मिळाली. अनेक प्रश्नांची उत्तरं तर अनन्यानं व्यवस्थित आठवत नाही, असं म्हणत टाळले. एनसीबीने अनन्याला पुन्हा एकदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलावलं आहे.
आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
गुरुवारी (२१ ऑक्टोबर) एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. पथकाने अनन्याच्या घरातून तिच्या मोबाईलसह काही वस्तू देखील जप्त केल्या. तसेच अनन्याला दुपारी २ वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले. अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी तिची चार ते पाच तास चौकशी केल्यानंतर पथक निघून गेले. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले.
हेही वाचा : “…तर अनन्या पांडे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे”; NCB च्या छाप्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रिया
दरम्यान, अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या व्यतिरिक्त अनन्या कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकरसोबत ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर अनन्या ईशान खट्टरसोबत ‘खाली पिली’ या चित्रपटात दिसली. लवकरच अनन्याचा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटात दिसणार आहे.