साध्वी कांचन गिरी यांनी आज (१८ ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठाकरे यांचं महाराष्ट्रातील लोकांएवढंच उत्तर भारतीयांवर प्रेम असल्याचं म्हटलं. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना त्यांनी आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांना पाठिंबा देण्यास सांगितलं. राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याचा विचार करत आहेत. तेथे त्याचं भव्य स्वागत करू, अशी घोषणाही त्यांनी केली. यानंतर आता कांचन गिरी कोण आहेत? याविषयी महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कांचन गिरींची ओळख करून देणारा हा खास आढावा.
कोण आहेत कांचन गिरी?
कांचन गिरी यांचा जन्म झारखंडमधील हजारी वाघ येथे झाला आहे. कांचन गिरी यांचे पूर्वज बिहारमधील आहेत. त्या मागील २५ वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. त्यांनी निसर्गाशी निगडीत असणारे आणि सध्याच्या परिस्थितीत सुधारणा हवी अशी कामे केली आहेत.
कांचन गिरी यांचे शिक्षण
कांचन गिरी यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. पुढे त्यांनी ज्योतिष शास्त्रामध्ये PHD केली आहे.
कांचन गिरी यांचं काम
कांचन गिरी यांनी भारतासह परदेशात देखील शेतकऱ्यांसाठी काम केले. गंगा यमुना या नद्यांमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते साफ-सफाई करण्याची मोहीम कांचन गिरी यांनी हाती घेतली होती. तसेच देशातील इतर मुख्य नद्या सफाई करण्याचे ध्येय हाती घेतले होते. देशात हिंदू धर्माचा प्रसार करण्यासह युरोपीय देशात देखील कांचन गिरी यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला आहे.
1991 मध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं कामही कांचन गिरी यांनी केलं. 2009 मध्ये कांचन गिरी यांनी यमुना आरतीचा शुभारंभ केला. दिल्ली येथील IIT घाटावर 50 पुष्पकलशांची स्थापना केली होती. त्यांनी देशात महिलांसंदर्भातील कायद्यावर वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. कांचन गिरी यांनी देशभरात 1 लाख वृक्षांची लागवड केली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना राज ठाकरेंना पाठिंबा देण्यास सांगणाऱ्या कांचन गिरी कोण आहेत? वाचा…
कांचन गिरी यांनी गाझियाबाद येथील झुप्पा गाव दत्तक घेतलं होतं. हे गाव दत्तक गाव दत्तक घेण्याचे मुख्य कारण हे येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
व्हिडीओ पाहा :