Meaning of Fadtus Word : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत टीका केली. यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंना फडतूस शब्दावरून प्रत्युत्तर दिलं. यानंतर फडतूस शब्द चर्चेत आहे. या निमित्ताने फडतूस शब्दाचा नेमका अर्थ काय याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले, “एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं. त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात. फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे.”

“मी नागपूरचा, त्यांच्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते”

“ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही. या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, याचं उत्तर त्यांना जनता देईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

‘फडतूस’ शब्दाचा नेमका अर्थ काय?

‘एवढा आटापिटा करून गेलो पण चित्रपट इतका फडतूस निघाला’ किंवा ‘इतक्या फडतूस गोष्टीसाठी तू जीव टाकत होतास?’ या वाक्यांवरून आपल्या सहज लक्षात येते की जी गोष्ट अतिशय टाकाऊ , क्षुल्लक आहे त्यासाठी हा शब्द वापरतो. पण मग अशा टाकाऊ गोष्टीसाठी ‘फडतूस’ हा शब्द कसा काय तयार झाला असावा बरं? फड म्हटल्यावर आपल्याला गप्पांचा फड आठवतो, नाहीतर थेट तमाशाचा. पण शेतामध्ये जी धान्य साठवण्याची जागा असते ज्यावर धान्याचा, कणसाचा ढीग ठेवला जातो त्यालासुद्धा ‘फड’ म्हणतात.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘फडतूस गृहमंत्री’ अशी टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “लाळ घोटत…”

शेतातून काढलेले हे धान्य सालासकट असते ज्याला ‘तूस’ म्हणतात. जेव्हा धान्य स्वच्छ करायला हा फड उडवला जातो, तेव्हा धान्य एका बाजूला आणि धान्याला चिकटलेले तूस, फोलपट दुसऱ्या बाजूला पडतात. त्यानंतर या तुसांचा, फोलपटांचादेखील ‘फड’ तयार होतो. अर्थातच हा ढीग टाकाऊ असतो. त्याचा काही खायला उपयोग नसतो. या टाकाऊ तुसांचा फड म्हणजे फडतूस. काही कामाचा नसलेला.