न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने मानहानीकारक पराभव पत्करल्यामुळे आयसीसी ताज्या क्रमवारीत ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. परंतु विराट कोहली आपल्या सातत्यपूर्व कामगिरीच्या बळावर फलंदाजांच्या क्रमवारीतील सर्वोच्च स्थानानजीक पोहोचला आहे. ताज्या क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेतील पाच सामन्यांत त्याने २९१ धावा केल्या आहेत. प्रथम क्रमांकावर असलेल्या ए बी डी व्हिलियर्सपासून तो फक्त दोन गुणांनी पिछाडीवर आहे. तसेच भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत सहाव्या स्थानावर आहे, तर शिखर धवनची घसरण झाली असून, तो ११व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताकडून रवींद्र जडेजा सर्वात पुढे नवव्या स्थानावर आहे.

Story img Loader