नारळी पोफळीच्या बागा, समोर अथांग पसरलेला सागर, विस्तीर्ण किनारे आणि प्रत्येक पावलाला लागणारी मऊ वाळू निसर्गाच हे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळत ते कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर. याच तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याची ब्लू फॉग मानांकनासाठी निवड झाली आहे.
ब्लू फॉगचे मानांकन मिळवण्यासाठी भारतातून एकूण आठ समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव भोगवे बीचला निवडण्यात आले आहे. जगातल्या सर्वोत्कृष्ट समुद्र किनाऱ्यांना ब्लू फॉगचे मानांकन मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्कर पुरस्काराला जे महत्व आहे तेच स्थान ब्लू फॉगचे आहे. त्यामुळे हे मानाकंन मिळाल्यास निश्चितच कोकणाची शान उंचावेल.
पण हे मानांकन इतक्या सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी अजून दोनवर्ष लागतील. मानांकन देताना पाण्याचा दर्जा, किनाऱ्याची स्वच्छता आणि पर्यटकांची सुरक्षितता हे मुद्दे लक्षात घेतले जातात.