कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने १२२ हिवाळी विशेष गाडय़ा सोडल्या असून आणखी पाच विशेष गाडय़ा ३० नोव्हेंबपर्यंत सोडण्यात येणार आहेत.
तिरूनेलवल्ली-दादर दरम्यान १६, २१, २३, २४ आणि ३० नोव्हेंबर रोजी या विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तिरूनेलवल्ली येथून दादरसाठी २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१० वाजता विशेष गाडी सोडण्यात येणार असून ती दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. दादर येथून तिरूनेल्वलीसाठी १६, २३ आणि ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० वाजता विशेष गाडी सोडण्यात येईल. या गाडीला १५ डबे असतील.    

Story img Loader