जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या कोमल नगरकर-शिर्के या नगरसेविका नाहीत, तर घाटकोपर-भटवाडी येथील नगरसेवक दीपक हांडे यांच्या विरोधात निवडणूक हरलेल्या उमेदवार आहेत. ‘जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने शिवसेना नगरसेविकेचे पद धोक्यात’ या मथळ्याखाली (लोकसत्ता ४ सप्टेंबर) या अंकातील वृत्तात अनवधानाने कोमल नगरकर-शिर्के या नगरसेविका असल्याचे प्रसिद्ध झाले होते. नगरसेवक दीपक हांडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर कोमल नगरकर- शिर्के यांनी हांडे यांच्या जातप्रमाणपत्राला आव्हान दिले होते. दरम्यान, हांडे यांनीही कोमल यांच्या जातप्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने जातपडताळणी समितीकडून याबाबत अहवाल मागविला होता. मात्र कारणमीमांसा करणारा हा अहवाल न्यायालयाच्या आदेशानंतरही सादर करण्यात न आल्याने कोमल यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले. तसेच प्रकरण पुनर्विचारासाठी पुन्हा समितीकडे पाठवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा