लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत. आता बुधवार, १० मे रोजी ठाण्यात सोडत काढण्यात येणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ८ मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. ही प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत.

हेही वाचा… मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या ‘कोअर कमिटी’ने फेटाळला; पुढे काय? सगळ्यांचं लक्ष

‘पीएमएवाय’साठी ३५१ अर्ज, २० टक्के योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडा गृहनिर्माणमधील घरांसाठी दोन हजार ४३८ अर्ज आणि ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत. आता ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी बुधवार, १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे.