मध्य रेल्वे यंदा कोकण रेल्वेमार्गावर दादर ते सावंतवाडीदरम्यान ५२ विशेष फेऱ्या चालवणार आहे. ११ एप्रिल ते ८ जून या कालावधीत दर मंगळवार, शुक्रवार, रविवार असे तीन दिवस ही गाडी दादरवरून सुटणार आहे. तर परतीची गाडी सावंतवाडीहून बुधवार, शनिवार आणि सोमवार या तीन दिवशी निघेल. गाडीचे आरक्षण सुरू आहे.
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावरून गोवा आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या काही विशेष गाडय़ांची घोषणा मध्य रेल्वेने याआधीच केली आहे. मात्र कोकण रेल्वेवर खास एकही जादा गाडी नसल्याची तक्रार प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत मध्य रेल्वेने ही विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
०१००३ दादर- सावंतवाडी ही गाडी दादरहून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सकाळी ७.५० वाजता सुटून त्याच दिवशी संध्याकाळी १९.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
तर ०१००४ सावंतवाडी-दादर ही गाडी दर बुधवार, शनिवार आणि सोमवार या दिवशी सकाळी ५.०० वाजता सुटून त्याच दिवशी संध्याकाळी १६.१० वाजता दादरला पोहोचेल. ११ एप्रिल ते ८ जून या दरम्यान या गाडीच्या एकूण ५२ फेऱ्या होणार आहेत.

Story img Loader