मुंबई : कोकणातून जाणारी रेल्वे अद्याप भारतीय रेल्वेत विलीन करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळण्यास अडचणी येतात. निधीची कमतरता भासते. त्याविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती आक्रमक झाली आहे. सध्या कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारने कोकण रेल्वेच्या स्थानकाबाहेरील परिसराचे नूतनीकरण केले असून स्थानकांतील अंतर्गत परिसर भकास आहे. भारतीय रेल्वेतील स्थानकांसाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यात येत आहे. त्यात कोकणातील फक्त दोनच स्थानके म्हणजे उडुपी आणि मडगावचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र महाराष्ट्रातील कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा त्यात समावेश नाही. तसेच अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यापैकी कोकण रेल्वेसाठी फक्त १,५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रवासी सुविधा वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत.
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
कोकणातून जाणारी रेल्वे अद्याप भारतीय रेल्वेत विलीन करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळण्यास अडचणी येतात. निधीची कमतरता भासते. त्याविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती आक्रमक झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2024 at 21:25 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway konkani passengers are always neglected mumbai print news ssb