मुंबई : कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावर ‘पॅसेंजर लूप लाईन ३’ कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.

शुक्रवारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजरचा रेल्वे प्रवास रत्नागिरी स्थानकावरून पहाटे ५.३५ ऐवजी सकाळी ७ वाजता म्हणजे रत्नागिरी स्थानकावरून १.२५ तास उशिराने सुटणार आहे. गाडी क्रमांक १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस प्रवास रत्नागिरी ते चिपळूण विभागादरम्यान काही काळ थांबवण्यात येईल. तसेच या कालावधीत मुंबईकडे येणाऱ्या आणि कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. त्यामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

Story img Loader