मुंबई : कोकण रेल्वे प्रशासनाकडून देशभरातील विविध भागात रेल्वे, बोगदे तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येतात. कोकण रेल्वेने आता थेट केनियन रेल्वेची देखभाल-दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. कोकण रेल्वेचा आफ्रिका खंडातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोकण रेल्वेला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळावे यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अथक प्रयत्न करीत आहेत. यातूनच कोकण रेल्वेने भारत-नेपाळ रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. आता केनियातील रेल्वेचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी कोकण रेल्वेने तयारी दर्शवली व त्याला केनियन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. केनियातील मगडी येथे टाटा केमिकल्स कंपनी असून, या कंपनीच्या महत्त्वाच्या कामासाठी तेथे मालवाहतूक करण्यात येते. या मालवाहतुकीच्या देखभालीसाठी कोकण रेल्वेशी करार करण्यात आला आहे. यासह ट्रॅक, लोकोमोटिव्ह आणि रोलिंग स्टाॅकसह रेल्वे प्रणालींचे पनर्वसन करण्यात आले आहे. आफ्रिका खंडातील हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्याचे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.ॉ
हेही वाचा : शीव रुग्णालय अपघात प्रकरण : डॉ. ढेरे यांना रुग्णालयात येण्यास बंदी घालण्याची मागणी
भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करतानाच व्यापार आणि वाणिज्य संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केला जात होता. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ”डेमू” रेक तयार करण्यात आला. त्यानंतर, बिहारमधील जयनगर आणि नेपाळमधील कुर्था या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू केली. तसेच, कोकण रेल्वेने दोन डेमू रेल्वेचे रेक नेपाळला प्रदान केले. याशिवाय, कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी काम करत असून प्रवासी सेवांचे संचालन आणि देखभालही कोकण रेल्वे पाहत आहे.
नवी मुंबईमधील मेट्रोचे काम कोकण रेल्वेकडे
नवी मुंबई येथील मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापन व देखरेखीचेही कंत्राट कोकण रेल्वेला मिळाले आहे. त्यामुळे लवकर या कामाला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा : Porsche Accident: “अल्पवयीन मुलासाठी अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन?” अंजली दमानियांचा आरोप काय?
कोकण रेल्वेची देशभरातील कामे
जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गिकेचे बांधकाम, रत्नागिरीमधील लोटो येथे रोलिंग स्टाॅक फॅक्टरीचे बांधकाम, केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय समुद्री पोर्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी, केरळमधील अनक्कमपोयल कल्लाडी मेप्पडी रोड बोगदा प्रकल्प, ईस्ट कोस्ट रेल्वेवरील खुर्डा रोड – बोलांगीर नवीन बीजी रेल्वे लिंक प्रकल्पासाठी व्हायाडक्ट, पूल, उड्डाणपुलाचे बांधकाम.