उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी ३८ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. तसेच जनशताब्दी एक्सप्रेस आणि राज्य राणी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दादर सावंतवाडी राज्य राणी एक्सप्रेस आणि मुंबई सीएसटी ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या दोन गाडय़ांना सध्या १२ डबे असतात. या दोन्ही गाडय़ांना जादा ५ डबे लावण्यात येणार आहेत. तर ३८ विशेष गाडय़ाही हंगामात सोडण्यात येणार आहेत.  या गाडय़ा रविवार, मंगळवार आणि शुक्रवार अशा आठवडय़ातून तीन दिवस चालविण्यात येणार आहेत. या गाडय़ा २१ एप्रिल ते २ जून या कालावधीत चालविण्यात येणार आहेत. आणि या सर्व गाडय़ांचे आरक्षण शुक्रवारपासून सुरू होत आहे.

Story img Loader