होळी-शिमग्याच्या सणाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने२३ ते ३१ मार्चदरम्यान, विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ००११५ ही दुपारी २.१० ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि रात्री ९.१० ला रत्नागिरी स्थानकात पोहोचेल. तर गाडी क्रमांक ००११६ ही गाडी सकाळी ६ वाजता रत्नागिरीहून सुटून दुपारी १.१० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण , संगमेश्वर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या विशेष गाडीला बारा डबे जोडण्यात आले असून त्यामध्ये एक एसी टू टायर, एक एसी थ्री टायर, चार आसन व्यवस्था असलेले डबे आणि चार सर्वसाधारण डब्यांचा समावेश आहे मुंबई-रत्नागिरी असा प्रवास करणाऱ्यांसाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा