बॉलीवूड कलाकार, प्रसिद्ध उद्योजक यांच्या आलिशान निवासस्थानांची मुंबईत अनेक उदाहरणे आहेत. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांसह बॉलीवूड कलाकार आणि उद्योजकांची निवासस्थाने देखील मुंबई दर्शनाला आलेल्यांचे आकर्षण असते. उच्चभ्रू वस्तीत घर घेणाऱयांमध्ये आता आणखी एका बड्या उद्योगपतीची भर पडली असून तब्बल ४१ अब्ज डॉलरच्या उद्योगसमूहाचा व्याप सांभाळणारे प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला हे मुंबईत घर घेणार आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी तब्बल ४२५ कोटी मोजण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या मलबार हिल येथील ‘जाटिया हाऊस’ हा आलिशान बंगला कुमारमंगलम बिर्ला विकत घेणार आहेत. एकूण ४२५ कोटी रुपयांच्या घराचा मुंबईतील हा सौदा आतापर्यंतचा सर्वात महागडा असल्याचे बोलले जात असल्याने मुंबईतील सर्वात महागडे घर कोणाचे याबाबत चर्वितचर्वण सुरू झाले आहे.
मलबार हिलमधील जाटिया हाऊस हा बंगला दुमजली असून १९५० मध्ये हा बंगला बांधण्यात आला होता. जाटिया बंधू गेल्या दोन वर्षांपासून हा बंगला विकण्याचा प्रयत्न करत होते. अलिशान जाटिया हाऊस विकत घेण्यासाठी कुमारमंगलम बिर्ला व अन्य दोन उद्योजकही या बंगल्यासाठी स्पर्धेत उतरले होते. मात्र, बिर्ला यांनी सर्वाधिक बोली लावून हा बंगला विकत घेतल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, बिर्ला समूहाने या व्यवहाराबाबत काहीही बोलण्यास नकारू दिला असून ही बाब खासगी असल्याचे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा