विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंदगड मतदारसंघात २३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीने कुपेकर यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने सारी पूर्वतयारी पूर्ण केली आहे. कुपेकर यांच्या पुतण्याला उमेदवारी द्यावी, असा पक्षात मतप्रवाह आहे. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा त्यास विरोध आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद होऊ शकतो. तो टाळण्याकरिता कुपेकर यांच्या घरात उमेदवारी देऊ नये, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीची उमेदवारी कुपेकरांच्या पुतण्याला?
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंदगड मतदारसंघात २३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या वतीने कुपेकर यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
First published on: 12-01-2013 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kupekar nephew will be the candidate of byelection