मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कुर्ला विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पक्षातील इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला असून इतर सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्ला विधानसभा मतदारसंघात कुर्ला पूर्व, कुर्ला पश्चिम, टिळक नगर आणि चुनाभट्टी परिसर मोडत असून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र कुडाळकर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेले. ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने या मतदारसंघातून प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी दिली.

हेही वाचा : मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त

प्रविणा मोरजकर या कुर्ला नेहरुनगर परिसरातील १६९ प्रभागातील माजी नगरसेविका असून त्यांच्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाची जवाबदारी होती. त्यांना पक्षाने बुधवारी उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला. मात्र पक्षात इतर सक्षम उमेदवार असताना, मोरजकर यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मला तिकीट मिळाल्याने विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आशा खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे प्रविणा मोरजकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurla assembly constituency shivsena ubt leaders oppose pravina morajkar mumbai print news css