मुंबई : कुर्ला येथे डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर ४० जण गंभीर जखमी झाले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत देण्यात आली. मंगळवारी मृतांच्या ३ नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यस्थापकांच्या हस्ते दोन लाख रुपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले. उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेश देण्यात येणार आहेत. कुर्ला बसस्थानक (पश्चिम) ते अंधेरी बस स्थानक (पूर्व) या बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-३३२ वर नियमितपणे बस चालवण्यात येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास या बस मार्गावर बस चालवण्यात येत असताना रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान बसचा कुर्ला येथे अपघात झाला. त्या अपघातात ४० नागरिक गंभीर स्वरूपात जखमी झाले. तर, ९ नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर २०२४ रोजी चौकशी समिती गठीत करण्यात आली. त्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले होते. तसेच जखमींच्या औषधोपचारांचा खर्च मुंंबई महानगरपालिका, बेस्ट उपक्रमाद्वारे दिली जाईल, असे बेस्ट उपक्रमाने सांगितले होते.

मंगळवारी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकाच्या कार्यालयात तीन मृताच्या नातेवाईकांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मदतीचे धनादेश स्वीकारले. तर, इतर नातेवाईक कार्यालयात आल्यावर त्यांना मदतीचे धनादेश दिले जाणार आहेत. यावेळी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक एस व्ही आर श्रीनिवास यांनी मृतांच्या प्रती संवेदना व्यक्त केली.