मुंबई : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशाच्या खिशातून मोबाइल चोरणाऱ्या तरुणीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या तरुणीने चोरलेला मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला असून ही तरुणी सराईत मोबाइल चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा मंत्रालयात टाहो, आंदोलकांनी सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या

हेही वाचा – गिरगावातील इमारत धोकादायक घोषित न करण्यासाठी दबाव? आयआयटीच्या अहवालाकडे काणाडोळा

मुंब्रा परिसरात राहणारे अमिरउल्लाह खान (५७) नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी लोकलमधून मुलुंड रेल्वे स्थानकात उतरले. त्याच वेळी आरोपी अंजली सोनवणेने (२०) त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाइल चोरला. तरुणीने तत्काळ हा मोबाइल तिच्या पर्समध्ये टाकला. ही बाब खान यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी स्थानकावरील काही महिलांनी तत्काळ या तरुणीला पकडले. काही वेळातच कुर्ला लोहमार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी झडती घेतली असता तिने चोरलेला मोबाइल सापडला. पोलिसांनी तात्काळ तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurla lohmarg police arrested a young girl who stole a mobile mumbai print news ssb