मुंबई : मालाड येथील प्रताप नगरमधील समुद्र बार रेस्टॉरंटमागे पश्चिम द्रुतगती मार्गालगत शुक्रवारी दुपारी १.१५ च्या सुमारास इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा घसरला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले.
प्रताप नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचा विकास अमिटी कन्स्ट्रक्शनतर्फे करण्यात येत असून इमारतीच्या बांधकामासाठी भलामोठा खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीचा ढिगारा बाजूलाच ठेवण्यात आला होता. हा मातीचा ढिगारा शुक्रवारी दुपारी खचून खड्ड्यात घसरून पडला. त्याखाली तीन कामगार अडकले.
हेही वाचा – मुंबई : एमएमआरडीएला ३००० पैकी केवळ २५०० कोटीच देणार, महापालिका प्रशासनाचा निर्णय
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसेच संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. यापैकी प्रेमचंद जैस्वाल (३९) आणि अन्य एका कामगाराला नजीकच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रेमचंद जैस्वालचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, संजय कुसा याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले.