कुलदीप घायवट, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील संवेदनशील रेल्वे स्थानकांत सुरक्षा यंत्रणा अत्यंत कुचकामी झाली असून, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा अभाव असल्याने सीएसएमटी रेल्वे पोलीस हद्दीत बंदूकधारी प्रवासी खुलेआमपणे फिरण्याची घटना घडली. काही स्थानकावर बॅग स्कॅनर यंत्र, मेटल डिटेक्टर धूळ खात पडले असून, काही स्थानकांत जादा यंत्रणेची आवश्यकता असताना, कमी यंत्रणेवर काम चालवले जात आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या संवदेनशील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या रेल्वे पोलीस हद्दीत एका अज्ञात व्यक्तीला अग्निशस्त्र आणि पाच काडतुसे घेऊन पकडले. मात्र रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानाने त्याची बेकायदेशीर सुटका केली. त्यामुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची दिसून येत आहे. एकीकडे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यावर कोटय़वधींचा खर्चाच्या घोषणा केल्या जात असताना, वास्तवात सुरक्षा व्यवस्थेची कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. तर महत्त्वाच्या स्थानकातील सुरक्षा यंत्रणा धूळ खात पडली असून सुरक्षेची कडी कमजोर झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नावाने बोंब असून प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.

हेही वाचा >>> मुंबई- नवी मुंबई- बदलापूर नवा मार्ग?

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) वर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आली. शस्त्रधारी सुरक्षा जवान तैनात केले होते. आताही शस्त्रधारी सुरक्षा जवान तैनात असून त्याचा पहारा आहे. मात्र बॅग स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर यासारखी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे दिसून आले. सीएसएमटीवरून दररोज सुमारे ११ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. तर, देशविदेशातील पर्यटक हेरिटेज स्थानक पाहायला येतात. सुमारे ९० अप आणि डाऊन मेल-एक्स्प्रेस सीएसएमटीवरून धावतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक सीएसएमटी स्थानकात येतात. मात्र त्याची आणि त्याच्या बॅगाची तपासणी होत नसल्याने, सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.

लांब पल्ल्याच्या गाडयामधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची बॅग तपासणी करण्यासाठी सीएसएमटीचा प्रवेशद्वार क्रमांक ४, ५ आणि ६ येथील आरक्षण केंद्र, चौकशी केंद्र आणि तिकीट केंद्राजवळ बॅग स्कॅनर यंत्रेआहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही यंत्रे बंद आहेत. त्यामुळे कोणताही प्रवासी तपासणी होत नाही. सीएसएमटीचे मुख्य प्रवेशद्वार, तिकीट खिडकी घर, फलाट ७ जवळ ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर’ यंत्र आहे. मात्र तेदेखील नादुरुस्त आहे.

मध्य रेल्वेच्या दादरवरून सुमारे ३ ते ४ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. या स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, श्वान पथक यांचा फेरफटका सुरू असतो. मात्र फलाट क्रमांक १३ वर बॅग स्कॅनर यंत्र, सेगवे, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यंत्रणा बंद अवस्थेत आहे. ही संपूर्ण यंत्रणा मोठया कपडयाने झाकून ठेवलेली दिसून आली. तर बॅग स्कॅनर यंत्र धूळ खात पडलेली आहे. तसेच दादर घातपात विरोधी तपासणी बाकडयावर सुरक्षा जवान बसण्याऐवजी पोलिओ डोस देणारे बसून होते.

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून सुमारे ६० ते ७० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. एलटीटीवरून नियमित ५२ रेल्वेगाडयांची ये-जा होते. तसेच दररोज ४ ते ६ विशेष रेल्वेगाडया धावतात. मात्र, याठिकाणची सुरक्षा व्यवस्था दादरप्रमाणेच  असल्याचे दिसून आले.

मुंबई सेंट्रलवरील पाचही डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर कार्यरत आहेत. बॅग स्कॅनरद्वारे प्रवाशांच्या पिशव्या तपासल्या जात आहेत. श्वान पथकाद्वारे यादृच्छिक पद्धतीने तपासणी केली जाते. तसेच दादर स्थानकात डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर उपलब्ध नसल्याने, शिन्फर श्वानाकडून तपासणी केली जाते.

– सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

दादरमध्ये यंत्रे धूळ खात

मध्य रेल्वेच्या दादरवरून सुमारे ३ ते ४ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. या स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, श्वान पथक यांचा फेरफटका सुरू असतो. मात्र फलाट क्रमांक १३ वर बॅग स्कॅनर यंत्र, सेगवे, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यंत्रणा बंद अवस्थेत आहे. ही संपूर्ण यंत्रणा मोठया कपडयाने झाकून ठेवलेली दिसून आली. तर बॅग स्कॅनर यंत्र धूळ खात पडलेली आहे.  

गेल्या वर्षीपासून सीएसएमटीवर बॅग स्कॅनर यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र स्थानकात अद्याप सुरक्षा यंत्रणा नसल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) वरून सुमारे ६० ते ७० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. एलटीटीवरून नियमित ५२ रेल्वेगाडयांची ये-जा होते. तसेच दररोज ४ ते ६ विशेष रेल्वेगाडया धावतात. मात्र, याठिकाणची सुरक्षा व्यवस्था दादरप्रमाणेच  असल्याचे दिसून आले.