सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे स्त्रियांना भेडसाविणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहरात रेखा मिरजकर यांच्या पुढाकाराने एक रॅली आयोजित करण्यात आली.
दुपारी तीन वाजता कोर्टनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रॅलीत तब्बल २०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील एक निवेदन देऊन रॅली विसर्जित करण्यात आली.
‘कीप ठाणे ब्युटिफुल’ या उपक्रमांतर्गत काढण्यात आलेल्या या रॅलीनिमित्ताने ‘लेडिज टॉयलेट डे’ची घोषणा करण्यात आली. स्त्रियांच्या प्रती आदर आणि सामाजिक सुरक्षा या गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात आला. भारतात पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृह सुविधा नसल्यामुळे स्त्रियांना अनेक प्रश्न भेडसावतात. देशातील एक आदर्श शहर अशी ख्याती असणाऱ्या ठाणे शहरातही महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालये नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महापालिका प्रशासनाने ती तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी ठाण्यात महिलांची रॅली
सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे स्त्रियांना भेडसाविणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहरात रेखा मिरजकर यांच्या पुढाकाराने एक रॅली आयोजित करण्यात आली.
First published on: 22-11-2012 at 08:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies rally for general toilet in thane