मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानुसार येत्या बुधवारपर्यंत (१२ मार्च) महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे.

ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, असे तटकरे यांनी आश्वस्त केले आहे.