सावरकर रोड प्रभागाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्यावर रविवारी दुपारी नेहरू मैदानाजवळ दोन हल्लेखोरांनी लोखंडी सळईने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारचाकी गाडीत बसल्या असल्याने या हल्ल्यातून त्या सुखरूप बचावल्या. दोन हल्लेखोरांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावरकर उद्यानातील आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपवून नगरसेविका कोठावदे आपल्या कारमधून घरी जात होत्या. या वेळी त्यांचा मोटारसायकलवरून दोघांनी पाठलाग करून नेहरू मैदानाजवळ त्यांच्या गाडीवर पाठीमागून लोखंडी सळईने गाडीवर हल्ला चढविला.
कोठावदे यांनी सांगितले, ‘झोपु’ योजनेच्या इमारतीत काही गैरप्रकार सुरू होते. ते आपण पोलिसांच्या निदर्शनास आणले होते. काही लाभार्थीना घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे ते आपल्यावर नाराज आहेत. तसेच, प्रभागात एक नाना-नानी कट्टा आपण विकसित करीत आहोत. त्यास दोन जणांचा विरोध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा