मुंबई : अभिनेत्री लैला खान हिच्यासह तिची आई आणि चार भावंडांच्या २०११ सालातील हत्याकांडाप्रकरणी लैला हिचे सावत्र वडील परवेज ताक याला सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. त्याच्या शिक्षेचा निर्णय मंगळवारी दिला जाईल, असेही न्यायालयाने परवेज याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवल्यानंतर स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परवेज याला न्यायालयाने खुनाचा कट रचणे, खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले. परवेज हा लैला हिच्या आईचा तिसरा पती होता. फेब्रुवारी २०११ मध्ये हे हत्याकांड उघडकीस आले होते. इगतपुरी येथील लैला हिच्या बंगल्यावर लैला, तिची आई आणि तिच्या चार भावंडांची हत्या झाली होती. परवेज याने लैला हिच्या आईच्या मालमत्तेवरून झालेल्या वादानंतर आधी तिची, नंतर लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली होती, असा पोलिसांचा आरोप आहे.

हेही वाचा…चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज याला अटक केल्यावर काही महिन्यांनंतर लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड उघडकीस आले होते. तसेच, त्यांचे कुजलेले मृतदेह बंगल्यातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी परवेज याच्याविरूद्ध ४० साक्षीदार तपासले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laila khan murder case stepfather parvez tak convicted mumbai print news psg