गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शनिवारपासून मुंबई परिसरात आणि धरणक्षेत्रातही विश्रांती घेतली आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस पडला आहे. गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस यंदा मुंबईत पडला आहे. पालघर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणे काठोकाठ भरली असून मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठाही ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. मात्र तरीही पाणी पुरवठ्याची चिंता कमी झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मेट्रो ३ च्या उर्वरित चार गाड्या सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये मुंबईत

मुंबईत गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाची वार्षिक सरासरी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी हे लहान तलाव भरून वाहू लागले. पालघर जिल्ह्यातील पावसामुळे तानसा, मोडकसागर ही धरणे देखील काठोकाठ भरली आहेत. मध्य वैतरणा हे धरणही आता भरण्याच्या मार्गावर आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सातही धरणात मिळून सध्या १० लाख ९३ हजार ३७९ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा एकूण पाणीसाठ्याच्या क्षमतेच्या ७५.५४ टक्के इतका आहे. अजून २५ टक्के पाण्याची तूट आहे.

मात्र मुंबईबरोबरच सातही धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात शहर भागात २ मिमी पावसाची नोंद झाली तर पश्चिम उपनगरात १० मिमी आणि पूर्व उपनगरात १२ मिमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही जेमतेम १५ ते ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> वांद्रे-वरळी सी-लिंकवरून थेट खोल समुद्रात उडी, नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोधमोहीम सुरू

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर ही धरणे काठोकाठ भरलेली असली तरी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठ्यात तूट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय अद्याप पालिका प्रशसनाने घेतला नाही. त्यातच गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. येत्या आठवड्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपात मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा व दिवसभरातला पाऊस

धरण ….. पाणीसाठा …. गेल्या चोवीस तासातील पाऊस मिमीमध्ये

उर्ध्व वैतरणा ……..५१.७० टक्के …..३० मिमी

मोडकसागर …….१०० टक्के ……२० मिमी

तानसा ……. १०० टक्के ……२२ मिमी

मध्य वैतरणा ……९१.५९ टक्के …..२१ मिमी

भातसा ……. ६८.२८ टक्के …..१४ मिमी

विहार …… १०० टक्के ……१३ मिमी

तुळशी …. १०० टक्के …….३७ मिमी