Lalbaug accident : मुंबईतल्या लालबाग या ठिकाणी रविवारी बेस्ट बसचा अपघात ( Lalbaug accident ) झाला. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेला आरोपी दत्ता शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. बलार्ड पिअर या ठिकाणाहून सायनच्या दिशेने बेस्ट बस चालली होती. त्यावेळी लालबाग या ठिकाणी दत्ता शिंदे आणि बेस्ट बस चालकाची हुज्जत झाली. या वेळी बसचं स्टिअरिंग दत्ता शिंदेने खेचलं त्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात ( Lalbaug accident ) ८ जण जखमी झाले तर नुपूर मणियार या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी दत्ता शिंदेला अटक करण्यात आली.
नेमकी काय घटना घडली?
२८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात ( Lalbaug accident ) मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता. बेस्टची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती. बस लालबागच्या गणेश टॉकिजजवळ आली त्यावेळी मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारने नाहक जीव गमावला. दत्ता शिंदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी दत्ता शिंदे अटकेत
लालबाग अपघात प्रकरणी आरोपी दत्ता शिंदेला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे एकूण ९ जण जखमी झाले. यातल्या नुपूर मणियारचा मृत्यू २ सप्टेंबरला उपचारांदरम्यान झाला.
अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता शिंदे हा देखील लालबागचाच रहिवासी आहे. तो त्याच्या पत्नी आणि मुलासह लालबागमध्ये राहतो. त्याने कुलाबा या ठिकाणाहून घरी येण्यासाठी ६६ नंबरची बस पकडली होती. मात्र बस त्याच्या स्टॉपपासून पुढे येऊ लागली तेव्हा चालक कमलेश प्रजापतीने मधेच बस थांबवण्यास नकार दिला. हे पाहून चिडलेल्या दत्ताने शिंदेने ड्रायव्हरला मारहाण केली आणि स्टिअरिंग फिरवलं. ज्यानंतर बसवरचा चालकाचा ताबा सुटला. या घटनेमुळेच अपघात झाला.