Lalbaug Accident News : दारुच्या नशेत एक माणूस कृत्य करतो काय आणि त्यामुळे दोन आयुष्य उद्ध्वस्त कशी होतात आणि त्यांच्या आयुष्याची शोकांतिका कशी होते याचं उदाहरण मुंबईत घडलं आहे. दारुच्या नशेत दत्ता शिंदे याने रविवारी चालकाशी वाद घातला. ही बाचाबाची इतकी झाली की दत्ता शिंदेने स्टिअरिंग फिरवलं, ज्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि ९ जण अपघातात जखमी झाले. याच अपघातात जखमी झालेल्या नुपूर मणियारचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने मणियार कुटुंबासह सगळं लालबाग हादरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी काय घटना घडली?

२८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता. बेस्टची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती. बस लालबागच्या गणेश टॉकिजजवळ आली त्यावेळी मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारने नाहक जीव गमावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaug accident nupur maniar life ends in lalbaug accident her dream of marriage broke scj
Show comments