Lalbaug Accident : गणेश उत्सव म्हटलं की मुंबईतली लगबग आणि गर्दी समोर येतेच. गणेश उत्सवाला अवघे पाच ते सहा दिवस राहिलेले असताना आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असताना मुंबईतलं लालबाग अपघाताने हादरलं. बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि लालबागमध्ये उत्सवाच्या रंगाचा बेरंग झाला. बेस्टचा अपघात झाल्याने ९ जण जखमी झाले. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला. लालबागमध्ये राहणारी २८ वर्षीय नुपूर मणियार या अपघातात मरण पावली.

नेमकी काय घटना घडली?

२८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता. बेस्टची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती. बस लालबागच्या गणेश टॉकिजजवळ आली त्यावेळी मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारने नाहक जीव गमावला.

Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
karnatak accident
कर्नाटकातील अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा ठार
Two bike riders die three injured in two separate accidents in Pune city
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी

हे पण वाचा- Mumbai Bus Accident : चालकाला ढकलून मद्यपीने हिसकावलं स्टीअरिंग, लालबागमध्ये मोठा बस अपघात, तरुणीचा मृत्यू, आठ जण जखमी

१ सप्टेंबरच्या रात्री झाला अपघात

नुपूर मणियार या तरुणीचा अपघाताता मृत्यू झाला. एका कुटुंबातल्या कर्त्या मुलीचा मृत्यू झाल्याने हे कुटुंब हळहळलं. नुपूर मणियारच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवला आहे. मणियार कुटुंबातली लेक गेली याला जबाबदार कोण? असा प्रश्न शोकाकुल मणियार कुटुंबाने विचारला आहे. नुपूर मणियार ही मणियार कुटुंबातली कर्ती मुलगी होती. तिचं लग्न ठरलं होतं. करोना काळात तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिने तिच्या आई आणि बहिणीची जबाबदारी नुपूर सांभाळत होती. मात्र काळ आला आणि घात करुन गेला. लालबागच्या अपघातात नुपूरचा दुर्दैवी मृत्यू झाला.

६६ क्रमांकाच्या बसचा लालबागमध्ये अपघात

सीएसटीहून सायनला जाणारी ६६ नंबरची बस चिंचपोकळी येथून खाली उतरत लालबाग सिग्नल जवळ पोहोचली. आणि त्या सिग्नल जवळच एक दुर्दैवी अपघात घडला. हा अपघात दारुच्या नशेत धुंद असलेल्या एका प्रवाशाच्या चुकीमुळे घडला. प्रवासी थांबा नसतानाही हा मद्यधुंद प्रवासी बस थांबवा असं सांगत असल्यामुळे बेस्टच्या बस चालकासोबत वाद घालत होता. यानंतर कहर म्हणजे, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरच्या अंगावर हात टाकला. अन् यामुळे बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरील गाड्यांना धडक दिली. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा प्रवासी दत्ता शिंदे अपघातानंतर पळून जात होता. मात्र, वाहकानं त्याला पकडलं अन्यथा ड्रायव्हर या घटनेत नाहक अडकला असता. या घटनेनंतर काळाचौकी पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलंं आहे.

नुपूरच्या आई-बहीण यांची जबाबदारी कोण घेणार?

एका दारूच्या नशेत असलेल्या या दत्ता शिंदेमुळे अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. तर आठ लोक यामध्ये जखमी आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या नुपूर मणियार या मुलीचं निधन झालं आहे. त्यामुळे आता या कुटुंबाचं काय होणार? याचा प्रश्न कुटुंबीयांना आणि सर्वच मित्रमंडळींना पडला आहे.

Story img Loader