आर्थिक गैरव्यवराहाप्रकरणी फरारी असलेले ‘आयपीएल’चे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले. मोदी सध्या ब्रिटनमध्ये आहेत.मोदींविरुद्धच्या इंटरपोल नोटीसबाबत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ‘ईडी’ने प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती विशेष न्यायालयाकडे केली होती. याआधीही न्यायालयाने मोदींच्या नावे अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मोदींचे प्रत्यार्पण करण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून ब्रिटन सरकारकडे पुढील प्रक्रियेबाबतचा प्रस्तावत अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात येईल.
महिलेला एसटीची धडक
ठाणे : रस्ता ओलांडत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेला राज्य परिवहन महामंडळाच्या बसची धडक बसून तिचा मृत्यू झाला. शमीम युसुफ खान असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हा अपघात घडला. या बसचा ड्रायव्हर अशोक सांगड (३३) यास पोलिसांनी अटक केली आहे.