आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचे वकील मेहमूद आब्दी यांनी परदेशातून गुंड रवी पुजारी याच्या नावाने धमकी मिळाल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात केली आहे. ललित मोदी यांच्या सर्व खटल्यांपासून दूर राहा, अशी धमकी देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मेहमदू आब्दी यांनी रविवारी दुपारी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांबरोबर मुंबई गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
परदेशात असलेला अंडरवर्ल्ड गुंड रवी पुजारी यांच्या नावाने धमकी आल्याचा आरोप आब्दी यांनी तक्रारीत केला आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने रवी पुजारी बोलत असून मोदी यांचे खटले लढवू नकोस अन्यथा तुला आणि कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे, अशी धमकी दिली. त्या व्यक्तीने यापूर्वीच कुटुंबीयांची माहिती काढायला स्थानिक गुंडांना सांगितल्याचे म्हटले आहे.
हा फोन ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ या यंत्रणेचा वापर करून करण्यात आला होता. त्यामुळे नेमका कुठून फोन आला ते समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडणी विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या धमकीमुळे माझ्या जीवितास धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणीही आब्दी यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा