Lamborghini fire Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडवर एका लक्झरी कारने पेट घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री जवळपास १० वाजून २० मिनिटांनी कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारला आग लागली. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लॅम्बोर्गिनी कारच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे.

गौतम सिंघानिया यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पेटलेल्या लॅम्बोर्गिनी या लक्झरी कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. “यासारख्या घटनांमुळे लॅम्बोर्गिनीची विश्वासार्हता आणि सुरक्षा स्टँडर्डबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात. किंमत आणि प्रतिष्ठा पाहाता कोणत्याही तडजोडीशिवाय गुणवत्तेची अपेक्षा असते संभाव्य धोक्याची नाही”, असे सिंघानिया म्हणाले आहेत.

रेमंड समूहाचे अध्यक्ष गौदम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनी कारच्या सुरक्षेबद्दल चिंता केल्यानंतर सोशल मीडियावर लोक यासंबंधी प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी देखील अशा लक्झरी कारने पेट घेतल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

लॅम्बोर्गिनी कारने पेट घेतल्याच्या घटनेबद्दल माहिती देताना अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाची एक गाडी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली आणि सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आली. दरम्यान या कारमध्ये किती जण प्रवास करत होते आणि आग लागण्यामागील नेमके कारण काय होते? याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा>> कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड…

गेल्या काही दिवसांमध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा गौतम सिंघानिया यांनी लॅम्बोर्गिनी कारबाबात प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्येही त्यांनी लॅम्बोर्गिनीचे व्ही १२ फ्लॅगशिप Revuelto या मॉडेलमध्ये इलेक्ट्रिकल संबंधी समस्या येत असल्याचा आरोप केला होता. यावेळी ते मुंबई अटल सेतूवर टेस्ट ड्रायव्हिंग करत असताना त्यांची कार बंद पडली होती

गेल्या आठवड्यात चंदीगड येथील मोहालीत एका चालत्या कारने पेट घेतला होता. या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा व्यक्ती रात्री सेक्टर ८८ येथून आपल्या फेज ३ बी २ येथे परतत असताना ही घटना घडली होती. सुदैवाने गाडी चालवणारा व्यक्ती सुरक्षितपणे पेटलेल्या गाडीतून बाहेर निसटला, मात्र या दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून गेली.

Story img Loader