मुंबई : परळीमधील आपली सुमारे तीन कोटींहून अधिक किमतीची जमीन अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी धाकदपटशा दाखवून लाटल्याची तक्रार प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी केली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संतोष देशमुख यांच्या हत्येवरून धनंजय मुंडे अडचणीत आले असतानाच दिवंगत प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी मुंडे यांना लक्ष्य केले आहे. परळीत प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावे करण्यात आली होती. ही जमीन धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्याकडून जबरदस्तीने लाटल्याचा आरोप त्यांनी केला.

धाक दाखवून कोऱ्या कागदावर आमच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. ६ जून २०२२ रोजी जमिनीची नोंदणी करण्यात आली. तेव्हा जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचे निदर्शनास आले, असे सारंगी महाजन यांनी सांगितले.