लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : हॉटेलमधून लॅपटॉप चोरून पोबारा केलेल्या आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली.

घाटकोपर परिसरात वास्तव्यास असलेले तक्रारदार महिन्याभरापूर्वी येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. यावेळी बाजूलाच ठेवलेला त्यांचा लॅपटॉप आज्ञात व्यक्तीने चोरला. ही बाब लक्षात येताच तक्रारदारांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी अजयकुमार सक्सेना (३८) याला अटक केली.

आणखी वाचा-मुंबई : अमोल किर्तीकर व सूरज चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

पोलिसांनी अजयकुमारच्या ताब्यातून लॅपटॉप, १२ एटीएम कार्ड आणि एक दुचाकी हस्तगत केली असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laptop stole accused arrested mumbai print news mrj