मुंबई: चेंबूरमधील नवीन भारत नगरमधील भीम टेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवरून मोठा दगड घरंगळून एका घरावर पडला. या दुर्घटनेत घरातील दोन तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले आहे.

भीम टेकडीजवळ वसलेल्या झोपडपट्टीमध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली. सर्व झोपलेले असताना टेकडीवरून एक मोठा दगड घरंगळत एका घरावर आदळला. घरात झोपलेले दोन भाऊ यामध्ये जखमी झाले. २५ वर्षीय अरविंद आणि आशिष अशोक प्रजापती या जखमी झालेल्या दोघांना शीव रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Story img Loader