मुंबई : सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्याने बघितल्यास दृष्टी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गॉगलचा वापर करून ते बघावे असा सल्ला देण्यात येतो. ग्रहणातील सूर्यकिरणांइतका घातक असलेल्या लेझर प्रकाशझोताच्या सार्वजनिक वापरावर बंदी घालण्याची किंवा त्याच्या वापराबाबत काही नियम घालण्याची आवश्यकता वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लेझर प्रकाशझोताचा वापर हा प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रांमध्ये सर्वाधिक होतो. डोळ्याचा पडदा, बुब्बुळांच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर प्रकाशझोताचा वापर केला जातो. मात्र त्याची तीव्रता, किती मिलीसेकंदापर्यंत वापरायचा, कोणत्या भागावर वापरायचा यानुसार गणित ठरलेले असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्या मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास डोळ्यातील रक्तवाहिन्या खराब होऊन दृष्टी कायमस्वरुपी जाते. लेझर शोचे कार्यक्रमही ५० मीटर लांबूनच प्रेक्षकांना दाखवले जातात. त्यामुळे लेझर प्रकाशझोत किंवा त्याची उपकरणे सार्वजनिक ठिकाणी वापरण्याबाबतचे नियम कडक करण्याची गरज आहे. तसेच ही उपकरणे प्रमाणित करून आणि वापराबाबत पोलीस परवानगी घेण्याची आवश्यकता असल्याचे जे.जे. रुग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा : अधोविश्व: दाऊद टोळीचा रुग्णालयात गोळीबार
मोकळ्या परिसरामध्ये लेझर प्रकाशझोताचा प्रकाश पाच किलोमीटरपर्यंत दिसतो. यावरून त्याची तीव्रता लक्षात येते. लेझर प्रकाशझोत आकाशाच्या दिशेने सोडण्यात येतो. मात्र मिरवणुकीमध्ये तो डोळ्याच्या पातळीवर फिरवला जातो. त्यामुळे प्रकाशझोत थेट डोळ्यांवर पडून आतील पडदा जाळतो. यामुळे दृष्टी कायमची जाते. मुंबईमध्ये यापूर्वी अशाप्रकारे काही घटना घडलेल्या आहेत. याबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्याने ते पटकन लक्षात आले नाही. सूर्यग्रहणाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या सूर्यकिरणांइतकाच लेझर प्रकाशझोत घातक असतो, त्यामुळे लेझर प्रकाशझोताकडे पाहताना गॉगलचा वापर करणे आवश्यक असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी सांगितले.
लेझर प्रकाशझोत थेट डोळ्यांवर पडल्यास आतील रक्तवाहिन्यांना इजा होऊन डोळ्यातील पडदा, बुब्बुळ आणि लेन्स खराब होतात. डोळ्यातील कोणताही नष्ट झालेला भाग पुन्हा तयार होत नाही.लेझर प्रकाशझोतामुळे डोळ्यातील मृत पेशी पुन्हा जागृत होत नाहीत. त्यामुळे दृष्टी कायमची जाते. परिणामी लेझर प्रकाशझोताबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. तसेच गणपती मिरवणूक व अन्य सार्वजनिक ठिकाणी त्याच्या वापरावर बंदी घालावी किंवा त्याच्या वापरासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक करावे. लेझर प्रकाशझोतामध्ये जाण्यापासून लोकांनी स्वत:ला दूर ठेवावे, असे पोद्दार रुग्णालयातील नेत्रविभागाच्या प्रमुख डॉ. सरला दुधाट यांनी सांगितले.
हेही वाचा : नांदेड, छ्त्रपती संभाजीनगर न्यायालयाकडून स्वतःहून दखल; नेमके काय घडले याची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश
कोणत्याही माध्यमाचा वापर न करता आपण जेव्हा थेट सूर्यग्रहण बघतो. त्यावेळी डोळ्याच्या पडद्यावर फोटो टॉक्सीटी तयार होते. तोच परिणाम लेझर प्रकाशझोतामुळे होतो. डोळ्याच्या रक्तवाहिनीतील पेशी या ५ ते १० टक्क्यांपर्यंत जळाल्या तर संबंधित व्यक्तीची दृष्टी राहते. मात्र त्यापेक्षा जास्त असल्यास त्याला वंधत्व येण्याची शक्यता असते. विनामाध्यम ग्रहण बघितल्याने दृष्टी गेलेल्या रुग्णांवर उपचार केल्याचे विक्रोळीतील दृष्टी नेत्रालयाच्या डॉ. अंजली इसरानी यांनी सांगितले.
हेही वाचा : नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप
डॉक्टरांचा सल्ला
- उत्सव आनंदात साजरा करा पण लेझर तसेच एलईडी लाईटचा वापर करू नये
- लेझर प्रकाशझोत सार्वजनिक ठिकाणी वापरण्याबाबतचे नियम कठोर असण्याची गरज आहे.
- ही उपकरणे प्रमाणित करून आणि वापराबाबत पोलीस परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.
- लेझर प्रकाशझोताकडे पाहताना गॉगलचा वापर करणे आवश्यक
- लेझर प्रकाशझोताबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
- गणपती मिरवणूक व अन्य सार्वजनिक ठिकाणी त्याच्या वापरावर बंदी आणावी
- लेझर प्रकाशझोतामध्ये जाण्यापासून लोकांनी स्वत:ला दूर ठेवावे.