इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले. परंतु पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटा प्रकरणी दोषी ठरणारा हिमायत बेग हा इंडियन मुजाहिद्दीनचा पहिला अतिरेकी ठरला आहे. इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्करे ए तोयबा या अतिरेकी संघटनांनी एकत्र येऊन केलेला हा पहिला स्फोट  होता. याप्रकरणी पाच अतिरेकी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले. बेग यानेच या स्फोटासाठी इंडियन मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या दोघा अतिरेकी संघटनांना एकत्र आणले होते. बेकरीतील या स्फोटप्रकरणात फरार अतिरेक्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. हिमायत बेग आणि फैय्याज कागझी यांची श्रीलंकेच्या कोलंबो येथे बैठक झाली होती. पुण्यात येऊन हिमायतनेच रेकी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा