अकोला ते औरंगाबाद ४०० केव्ही उच्चदाब वाहिनीच्या क्षमतावाढीसाठी ‘महापारेषण’ने सुरू केलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून तब्बल ४५० अधिकारी-कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाकीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर राज्याच्या काही भागात गेले दोन दिवस सुरू असलेले तीन ते चार तासांचे भारनियमन बंद होईल, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.
अकोला ते औरंगाबाद उच्चदाब वाहिनीमधून सध्या एक हजार मेगावॉट वीज वाहून आणली जाते. क्षमतावाढीनंतर ते प्रमाण दोन हजार मेगावॉट इतके होईल. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, नवी मुंबई आदी भागातील विजेची वाढती मागणी पूर्ण करणे सुलभ होणार आहे. शुक्रवार सायंकाळीपासून तब्बल ४५० अधिकारी-कर्मचारी या कामात जुंपले आहेत.
कामानिमित्त भारनियमन सुरू असले तरी सायंकाळी पाचनंतर भारनियमन करावे लागणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

Story img Loader