मुंबई : मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील (स्वायत्त वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत होती. आता विद्यापीठातर्फे मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना गुरुवार, ३१ ऑगस्टपर्यंत http://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा होणार सुरू

विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर स्तरावरील ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ , ‘मानव्यविज्ञान’, ‘आंतरविद्याशाखीय’ आणि ‘वाणिज्य’ विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.