मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्जत – खोपोली दरम्यानच्या १५ किमी मार्गावरून ताशी ६० किमीऐवजी ९० किमी वेगाने लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून अतिरिक्त वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधेत वाढ करण्यात येणार आहे. यासाठी पळसधरी – खोपोली अप आणि डाऊन मार्गावर २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत रात्री १.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई : एटीएम केंद्रात चोरी करणारी सहा जणांची टोळी अटकेत, कुरार पोलिसांची कारवाई
हेही वाचा – मुंबई : अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक
खोपोलीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी आणि रात्री १२.५५ वाजता कर्जत येथे पोहोचणारी खोपोली – कर्जत लोकल ब्लॉक कालावधीतील ६ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीवरून रात्री ११.१८ वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. त्यानंतर कर्जत – खोपोली दरम्यान लोकल सेवा ६ दिवसांसाठी बंद राहील. सीएसएमटी येथून रात्री १०.२८ वाजता खोपोलीला जाणारी शेवटची लोकल असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.