अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. सुशांत सिंह राजपूत याने काल त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्य आल्याने त्याने त्याचे आयुष्य संपवले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला होता. काही वेळापूर्वीच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे पण वाचा: सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अंत्यसंस्कारासाठीचे काही नियम सरकारने लागू केले आहेत. त्या नियमांनुसार सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी निवडक लोकांचीच उपस्थिती होती. हिंदी सिनेसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीतले काही लोक सुशांतला अखेरचा निरोप देणअयासाठी आले होते. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक कपूर, वरुण शर्मा, विवेक ओबेरॉय हे सगळे सुशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकारांनी सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला होता.

Story img Loader