लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकाला ४४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ने मान्यवर कलाकारांच्या संचात रंगमंचावर नव्याने ‘वस्त्रहरण’चे खास ४४ प्रयोग करण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी आजवर मुंबई आणि ठाण्यात झालेल्या ४३ प्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?

शेवटचा ४४ वा प्रयोग गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यात रंगणार आहे. त्यानंतर पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या नाटकाचे प्रयोग होतील, अशी माहिती निर्माते प्रसाद कांबळी यांनी दिली. रंगभूमीवर १९८० साली ‘वस्त्रहरण’ दाखल झाले. नाटकाला मालवणी नव्हे तर अन्य भाषा, प्रांतातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ४० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी नव्या कलाकारांच्या संचातील हे नाटक पाहण्याचा आनंद घेतला.

आणखी वाचा-चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी

४४ वा प्रयोग गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे होईल. गेल्या ४० वर्षांतील ५,३०३ वा विक्रमी प्रयोग आहे. याही प्रयोगाचा रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन प्रसाद यांनी केले. मच्छिद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ हे नाटक १६ फेब्रुवारी १९८० रोजी रंगभूमीवर आले. मालवणी भाषेतील या नाटकाला प्रेक्षकांनी उचलून धरले. १७५व्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी हजेरी लावली होती.

मुंबई, ठाण्यात वस्त्रहरणाच्या झालेल्या ४३ प्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. शेवटचा ४४ वा प्रयोग गुरुवारी ठाण्यात रंगणार आहे.

आणखी वाचा-बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार

  • २००९ साली भरत जाधव, संजय नार्वेकर, प्रशांत दामले, जितेंद्र जोशी यांना घेऊन ‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग करण्यात आला होता, त्यावेळी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, राज ठाकरे असे महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेते एकत्र आले होते.
  • पुन्हा एकदा २०१८ मध्ये आनंद इंगळे, अंशुमन विचारे, सुनील तावडे, पुष्कर श्रोत्री, दिगंबर नाईक, रेशम टिपणीस या प्रसिद्ध कलाकारांच्या संचात ‘वस्त्रहरण’चे नव्याने काही प्रयोग करण्यात आले होते. दिगंबर नाईक, पुष्कराज चिरपुटकर, प्रियदर्शन जाधव, सुनील तावडे, अंशुमन विचारे, प्रणव रावराणे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या संचात हे नाटक मुंबई आणि ठाण्यात सादर करण्यात आले.
  • ठाण्यातील शेवटच्या प्रयोगानंतर पुढच्या काही महिन्यांत पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोकणपट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रातही या कलाकारांच्या संचात नाटकाचे काही प्रयोग होतील, असे कांबळी यांनी स्पष्ट केले.