शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याने अस्वस्थ झालेल्या लतादीदी यांनी आपल्या प्रस्तावित म्युझिक कंपनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. बाळासाहेब हे मला घरच्यासारखे आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ झाले आहे. माझ्या प्रार्थना बाळासाहेबांबरोबर आणि त्यांच्या पूर्ण परिवाराबरोबर आहेत, असे लतादीदी म्हणाल्या.
लताबाईंच्या म्युझिक कंपनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या रविवारी, १८ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, बाळासाहेबांची नाजूक प्रकृती लक्षात घेता लताबाईंनी आपला कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांनी बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ‘मातोश्री’वर गर्दी केली होती. अमिताभ व अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, गोविंदा, विनय आपटे यांनी आज मातोश्रीला भेट दिली. चित्रपटकर्मी प्रीतिश नंदी यांनीही आपण बाळासाहेबांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.     

Story img Loader