लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : वसई-विरारचा पाणी प्रश्न मार्गी लावणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडले आहे. ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाल्याने लोकार्पण पुन्हा लांबणीवर पडले आहे. तर वसई-विरारकरांची अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा वाढली आहे.

मुंबई महानगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर तर मीरा-भाईंदरला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर अशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिला टप्पा जून मध्येच पूर्ण झाला आहे. हा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यास वसई-विरार शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून वसई-विरारकरांचे डोळे या पहिल्या टप्प्याकडे लागले आहे. असे असताना जूनमध्ये पूर्ण झालेल्या पहिल्या टप्प्याचे अद्याप केवळ लोकार्पण न झाल्याने वसई-विरारकरांना तहानलेलेच रहावे लागत आहे.

आणखी वाचा-झोपू इमारतींमधील लिफ्टला जाळीचे दरवाजे नको, गोरेगाव आग दुर्घटना चौकशी समितीची शिफारस

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या टप्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. मात्र यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने लोकार्पणाची प्रतीक्षा सुरु झाली. ती अद्याप सुरूच आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या मध्यावर पंतप्रधान मुंबईत येणार असल्याने राज्य सरकारने त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरविले. मात्र काही कारणाने हा मुहूर्तही रद्द करण्यात आला. पुढे ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नवी मुंबई मेट्रोच्या उदघाटनासाठी येणार असल्याने राज्य सरकारने यावेळी सूर्याच्या पहिल्या टप्प्याचेही लोकार्पण उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवी मुंबईतुनच ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र आता ही तारीखही रद्द झाली असून लोकार्पण पुन्हा लांबणीवर गेले आहे. पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाल्याने नवी मुंबई मेट्रोसह इतर सर्व प्रकल्पाचे लोकार्पण रद्द झाले आहे.