माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमालाही मुंबई काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. गुरुदास कामत यांनी सकाळीच आदरांजली वाहिली तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मोटार रॅलीसह नंतर पोहोचले.
कुपरेज मैदानातील राजीव गांधी यांच्या पुतळ्यासमोर आदरांजलीचा कार्यक्रम मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित केला जातो. सकाळी नऊ वाजता काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत, जनार्दन चांदूरकर, मधू चव्हाण, बलदेव खोसा, राजहंससिंह आदी सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मोटार बाइक रॅलीचे आयोजन केले होते. निरुपम यांच्यासमावेत खुल्या जीपवर आमदार भाई जगताप, वर्षां गायकवाड आदी होते. निरुपम यांची रॅली सकाळी साडेअकराच्या सुमारास कुपरेज मैदानात पोहोचली. मग मुंबई काँग्रेसच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

Story img Loader