लोकसत्ता प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुंबई: एटीकेटी व नियमित परीक्षेच्या तारखा समांतर असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) ६ जूनपासून सुरू होणारी चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला होता. आता सदर परीक्षा १२ ते २० जून २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिंदे गटाच्या युवा सेनेने मागणी केली होती.
या परीक्षेचे सुधारित सविस्तर वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना २० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असेल. याचसोबत मोबाइल फोन, डिजिटल घड्याळ व उपकरणे परीक्षा केंद्रावर आणता येणार नाहीत.
First published on: 19-05-2023 at 13:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law branch 4th session examination from 12th june mumbai print news mrj