भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसने आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
लिएंडर आणि जोडीदार रिहा पिल्लई यांच्या मुलीचा ताबा आपल्याला कायमस्वरुपी मिळावा यासाठी पेसने शनिवारी याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाच्या परवानगी शिवाय रिहाने आपल्या मुलीला भेटू नये असेही त्याने या याचिकेत म्हटले आहे. रिहा आपल्या मुलीला हानी पोहचवू शकते आणि तिला जबरदस्तीने देशाबाहेर घेऊन जाईल, अशी भीती लिएंडरने व्यक्त केली आहे.
रिहा ही अभिनेता संजय दत्तची आधीची पत्नी आहे. पेस आणि रिहाचे लग्न झाले नाही मात्र २००३ पासून ते एकत्र राहत आहेत.

Story img Loader