आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरला असल्याची माहिती समोर आली आहे. वन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी कॅम्पसमध्ये बिबट्य़ा शिरल्याची माहिती मिळाली. वन अधिकारी, तज्ञ आणि डॉक्टरांची टीम आयआयटी पवई कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे. बिबट्या नंक्की प्रयोगशाळेत किंवा कॅम्पसमध्ये कुठे लपून बसला आहे, याची कुठलीच माहिची उपलब्ध झाली नसून, शोध सुरू आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या कॅम्पसमध्ये शिरल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली होती, असं वन अधिका-यांतर्फे सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा