येथील श्रीनगरजवळील वरीचा पाडय़ातील कृष्णा लोहारकर यांच्या झोपडीत शुक्रवारी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास अचानक बिबळ्या शिरल्याने परिसरातील नागरिक, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच झोप उडाली. घरातील मंडळींनी बाहेर पळ काढला. काळोखात बिबळ्याचा ठावठिकाणा समजत नव्हता. पहाटे चार वाजेपर्यंत त्याचा शोध घेतला जात होता. अखेर गवताच्या गंजीत लपलेला बिबळ्या या सर्व मंडळींच्या हातावर तुरी देऊन जंगलात पळून गेला.
आणखी वाचा